खापरखेडा :- दिनांक ०६/०८/२०२३ चे सकाळी ०६.०० वा. सुमारास यातील आरोपी नामे- शरद बोपचे रा. शिल्लेवाडा वस्ती याने फिर्यादीचे घरासमोर जाऊन जोरजोराने ओरडून फिर्यादीचे घरावर गोटे मारले. फिर्यादी ही बाहेर आली असता यातील आरोपी याने फिर्यादीचा हात पकडून जवळ ओढून फिर्यादीच्या मनाला लज्जा होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीविरुध्द कलम ३५४, ३५४(अ), २९४, ३३६, ५०६ भादवि. कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव पोस्टे खापरखेडा हे करीत आहे.