जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

रामटेक :- यातील फिर्यादी नामे- सचिन लक्ष्मीकांत संगीतराय, वय २७ वर्ष, रा. अंबाळा ता. रामटेक यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. रामटेक येथे अप. क्र. १२२/२०१९ कलम ३०२, २०१ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.

यातील मृतक महिला नामे- कमला पतिराम होंगे ही आरोपी नामे- प्रमोद पतीराम ढोंगे, वय ३० वर्ष, रा. अंबाळा ता. रामटेक याची आई असून दोघेच परी राहत होते. आरोपी हा दारू पिण्याच्या सवयीचा असून नेहमी मृतक हिला पैशाच्या व जेवणाच्या कारणावरून मारहाण करायचा. यातील आरोपीने आपल्या आईला दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही या कारणावरून आरोपीने मृतक आईला कुन्हाडीने मारून जिवानीशी ठार केले.

सदर प्रकरणाचे तपास पोलीस उपनिरीक्षक राजु मृत्युपोड पोस्टे रामटेक यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले, आज दिनांक २१/०४/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश देशमुख यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास व ५०००/- रु. दंड दंड न भरल्यास ०१ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने एपीपी नेवारे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोशि/ २२२९ संदीप सहारे पोस्टे रामटेक यांनी मदत केली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

Sat Apr 22 , 2023
मौदा :- अंतर्गत १३ किमी अंतरावर गुल्लर फाटा मौदा येथे दिनांक २०/४/२०२३ चे ००/२० वा. ते ०२/३० वा. दरम्यान बिना नंबरचा स्वालीस कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व हिरव्या रंगाची विना नंबरची ट्रॉली चा चालक आरोपी नामे १) स्वप्नील वसंता साहारे, वय २६ वर्ष, रा. आंबाडी केसोरी कामठी व मालक नामे-२) सौरभ उर्फ लक्की गजानन भिवगडे वय २५ वर्ष, रा. झुल्लर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com