केळवद :- अंतर्गत मौजा तिष्टी (खुर्द) येथील फिर्यादी नामे अनुराग कोटीराम जिवतोडे, वय २५ वर्ष, रा. वार्ड क्र. ०३ भारती ले आऊट सावनेर यांची मौजा तिप्टी (खुर्द) येथे शेती आहे. त्या शेतामध्ये शेती उपयुक्त साहीत्य ठेवण्याकरीता टीणाचा पॅक बंद गोठा बांधलेला आहे. त्यामध्ये शेतात वापरणारे साहित्य फवारणी यंत्र व वखराचा फास व इतर सामान ठेवले होते व बाजूला ट्रॅक्टर व रोटावेटर व इतर सामान ठेवण्याकरीता टिणाचे शेड उभारलेले आहे. दि. १३/०७/२०२३ रोजी फिर्यादी हे शेतात गेले असता तर टिनाच्या गोठ्यामध्ये ठेवलेले फवारणी यंत्र व वखराचा फास ठेवले होते ते तिथेच होते. त्यानंतर फिर्यादी टिणाच्या गोट्याला कुलूप लावून सांयकाळी ०६/०० वा. मौजा तिष्टी शिवारातून सावनेरला घरी परत आले. त्यानंतर दि. १७/०७/२०२३ रोजी ०४/३० वा. दरम्यान फिर्यादी शेतात गेले तर टिणाच्या गोठाला लावलेले कुलूप तुटलेले दिसले त्यामुळे फिर्यादीने गोठ्यात आत जाऊन पाहीले तर गोठ्यात ठेवलेले फवारणी यंत्र किमती अंदाजे ३०००/-रू वखराच्या ०४ फास किमती अंदाजे २०००/- रू. असा एकूण ५०००/- रूपयाचा मुद्रद्देमाल आरोपी नामे – किशोर नेहारे, रा. तिष्टी (बू) याने मित्राच्या मदतीने चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. केळवद येथे आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कामटे पोस्टे केळवद हे करीत आहे.