पो.स्टे. उमरेड :- अंतर्गत ०३ किमी अंतरावर मौजा बाळकृष्ण नगर परसोडी रोड उमरेड येथे दिनांक ३०/०५/२०२३ चे २०.०० वा. ते दिनांक ३१/०५/२०२३ मे ००.१५ वा. दरम्यान फिर्यादी नामे शैलेश विजय असलावार, वय ४५ वर्ष, रा. मौजा बाळकृष्ण नगर परसोडी रोड उमरेड उत्तम सातव यांचे घरी किरायाने राहतात हे घराला मुख्य दरवाजाला कुलूप लावून बाहेर कार्यक्रमाकरीता गेले असता कार्यक्रम करून घरी परत आले तेव्हा त्यांना घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडलेल्या स्थितीत दिसले असता पत्नीसह बेडरूमध्ये जावुन आतील आलमारीची पाहणी केली असता चोरीस गेलेला मुद्देमाल २ ) सोन्याचे मंगळसूत्र ३.५ तोळे किंमती अंदाजे १,०५,०००/- रू २) सोन्याचे कानातले रिंग ५ ग्रॅम किमती १५०००/- रू ३) सोन्याचे लॉकेट ८ ग्रॅम किमती अंदाजे २४०००/- रु. ४. सोन्याची नथ २ ग्रॅम किमती ६०००/- रु ५) सोन्याचे डोरल्याचे मनी ५ ग्रॅम किंमती १५०००/- रु. ६) सोन्याचे कानातले टॉप्स ३ ग्रॅम ९०००/- रु. ७) चांदीचे जोडने १ तोळा किंमती १०००/- रु. व नगदी ७०००/- असा एकूण १,८२,०००/- रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडे हे करीत आहे.
घरफोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com