उमरेड :- अंतर्गत मौजा कावरापेठ उमरेड ०२ किमी पश्चिम, येथे फिर्यादीचे घरी कोणीही हजर नसतांना यातील अज्ञात आरोपीने फिर्यादीचे दाराचे कुलूप उघडुन आतमध्ये ठेवलेले दागिने १) सोन्याचा गोप १२ ग्रॉम अंदाजे कि ४८०००/-रू, २) सोन्याचा लहान गोप ५ ग्रॅम अंदाजे २००००/-रू, ३) सोन्याची चपलाकंठी २५ ग्रॉम अंदाजे कि १०००००/- ४) सोन्याचे कानातने दोन टाप्स ४ ग्रॉम अंदाजे कि १६०००/५) सोन्याचे कानातल्या दोन कुडया १ ग्रॉम अंदाजे कि ४०००/६) एक सोन्याची नथ २ ग्रॉम अंदाजे कि ८०००/-रू ७) सोन्याचे डोरल २ ग्रॉम अंदाजे कि ८०००/- ८) सोन्याचे पीटीव १५ मनी दोन ग्रॉम अंदाजे कि ८०००/- रू ९) सोन्याची अंगठी ४ ग्रॅम अंदाजे कि १६०००/-रू असे एकुण ५७ ग्रॉम सोन्याचे दागीने एकुण कि अंदाजे २,२८,०००/- रू चा माल कोणीतरी अज्ञात चोराने दिनांक ०९/१२/२०२३ रोजी चे सकाळी १०/१५ ते १०/४५ वा दरम्यान चोरून नेले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे राजेंद्र मानीकराव रोहणकर वय ५७ वर्ष रा कावरापेठ उमरेड पारषिवनी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. उमरेड येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील पोउपनि/ दिनेश खोटेले पो स्टे उमरेड हे करीत आहे.