पो.स्टे. मौदा :- अंतर्गत ०१ कि. मी. अंतरावरील हनुमान नगर वार्ड क्र. ६ मौदा येथे दिनांक ०१/०८/२०२३ चे ०३.०० वा. ते दिनांक ०२/०८/२०२३ से १०.३० वा. दरम्यान फिर्यादी अविनाश मारोतराव जाने, रा. हनुमान नगर वार्ड क्र. ६ मौदा हा दुधाचा धंदा करतो. फिर्यादीचा दररोज १०० लिटर दुध विक्री असल्याने फिर्यादीचे १० दिवसाचे पैसे ५००००/- रु. आले होते. दि. ०१/०८/२०२३ रोजी दुपारी ३.०० वा. दरम्यान फिर्यादी आपल्या संपूर्ण परिवारासह घराला कुलुप लावून गावी गेले होते व रात्री ईसापूर इथेच थांबले. दि. ०२/०८/२०२३ चे सकाळी १०/३० वा. फिर्यादीला शेजारी नामे देवाजी भोयर यांचा फोन आला व त्यांनी सांगितले कि तूमच्या घराच्या गेटला लॉक आहे. व घराचा लॉक तुटलेला असून दरवाजा उघडा आहे. अशी माहीती मिळताच फिर्यादी ११. ३० वा. दरम्यान मौदा येथे पोहचले असता घराचे दार उघड़े व दाराची कडी कापलेली दिसली. घरातील बेडरूम मधील लोखंडी आलमारीचे लॉकर तुटलेले दिसले व लॉकर मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम दिसून आली नाही. दागिन्याचे वर्णन १) एक सोन्याची पोत पावने तिन तोळे ८२०००/-रु. २) सोन्याची पोत अडीच तोळयाची १७५०००/-रु. ३) सोन्याचा गोफ दीड तोळ्याचा ४५०००/-रु. ४) रोख रक्कम ५००००/-रु. एकूण किंमत २,५२,०००/-रु. कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मोदा येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे हे करीत आहे.