पोस्टे अरोली :- अंतर्गत ०८ कि.मी. अंतरावरील मौजा इंजनी शिवार येथे दिनांक ३१/०५/२०२३ ८/३० वा. ते ५/०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ यांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे अरोली हद्दीतील मौजा ईजनी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा इंजनी शिवार येथे पोलीस स्टेशन अरोली येथील पोलिस स्टाफ यांनी नमुद घटनास्थळी जावून चेक केले असता आरोपी चालक नामे १) भरत कुशाल अतकरी, रा. मोरगाव ता. मौदा जि. नागपुर २) मालक स्नेहल प्रकाश दिवे रा. इंजनी ता. मौदा जि. नागपुर यांनी आपले ताब्यातील ट्रॅक्टर क्र. एम. एच.- ४० सी. ए. ४९८४ संयुक्तरीत्या अवैध रेती वाहतुक करतांनी मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातून ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० / सी. ए-४९८४ अंदाजे किंमती ३,००,०००/- रु. व विना क्रमांकाची ट्रॉली किंमत अंदाजे १,५०,०००/- रु. व चालक भरत कुशाल अंतकरी रा. मोरगाव याचे ताब्यातुन रेडमी कंपनीचा काळा कलर असलेला मोबाईल किमती अंदाजे २०००/-रु. असा एकूण ४,५२,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीतांविरुध्द कलम ३७९, ५११ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोथले हे करीत आहे.
अवैध रेती चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीताविरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com