खापा :- अंतर्गत २२ कि. मी अंतरावरील मौजा सोनपुर शिवार येथे दिनांक ०५/०८/२०२३ से २१.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे प्रशांत रमेश कुंभरे, वय २५ वर्ष रा. सोनपुर ता. सावनेर जि. नागपूर यांची आई जखमी नामे माधुरी रमेश कुंभरे, वय ४२ वर्ष, रा. सोनपूर ता. सावनेर जि. नागपूर आणि लहान भाऊ प्रजित असे घरी हजर होते. रात्री ०८/३० वा. सुमारास लहान भाऊ प्रजित याने आई माधुरी हिला म्हटले की “तु दारु पिऊन नुस्ती इकडे तिकडे फिरत असते त्यामुळे गावातील मुले मला काहीही बोलत असतात.” असे म्हणून प्रजित याने आई सोबत बाचाबाची केली तेव्हा फिर्यादीचा मामा नामे- गणेश धुर्वे आणि मामी संगिता यांनी येऊन त्याला समजाविले त्यानंतर फिर्यादी मामा, मामी यांचे सोबत त्यांचे घरी जेवण करण्यास गेले रात्री ०९/०० वा. सुमारास जेवन करीत असतांना फिर्यादीला त्याचे आईचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकु आल्याने फिर्यादी त्याचे मामा नामे गणेश धुर्वे आणि मामी संगिता असे मिळून फिर्यादीचे घरी गेले असता फिर्यादीचा लहान भाऊ प्रजित हा घराबाहेर येतांना दिसला. घराचे आत गेले असता फिर्यादीची आई माधुरी ही घरातील बैठक खोलात जखमी अवस्थेत दिसली तिच्या गळ्यावर धारदार वस्तुने मारल्याचे चिरे दिसत होते व त्यातून रक्त निघालेले होते तसेच घरातील जमीनीवर फ्लोरींगवर सुद्धा भरपुर रक्त सांडलेले होते तेव्हा आई माधुरी हिने सांगीतले की प्रजित याने तु दारू पिते आणि नुस्ती फिरत राहते तुला तर आता जिवंत मारूनच टाकतो असे म्हणून लहान कैचीच्या धारदार पात्याने माझे गळ्यावर चिरे मारून जखमी केले. फिर्यादी आणि मामी संगिता असे घरा बाहेर आले तेव्हा लहान भाऊ प्रजित याने घरासमोरील सिमेंट रोडवर स्वतःचे डाव्या हातावर कैचीच्या धारदार पात्याने चिरामारून स्वतःला सुध्दा जखमी केले तेव्हा त्यांनी लगेच महिन्द्रा बोलेरो वाहन बोलावून आई माधुरी आणि भाऊ प्रजित यांना वाहनात टाकुन उपचाराकरीता पीएचसी बडेगाव येथे आणले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. खापा येथे आरोपीविरुध्द कलम ३०७ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे पोस्टे खापा हे करीत आहे.