– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई
भिवापुर :-दिनांक ०८/०१/२०२४ रोजी सकाळी ०८.०० चे दरम्यान पो. स्टे. भिवापुर हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना नीलज फाटा ते भिवापूरकडे १२ चक्का टिप्पर ट्रक क्रं. MH-49/AT-4371 येताना दिसला त्यास थांबवून तपासले असता सदर टूक मध्ये अंदाजे ०८ ब्रास रेती वाहतूक करतांना मिळून आल्याने टिपर चालकास रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने टिप्पर टुक क्रं. MH-49/AT-4371 किंमत रु. २५,००,०००/- त्यामध्ये रेती ०८ ब्रास किंमती ४०,०००/-रु. असा एकूण २५,४०,०००/-रू. या मुद्देमाल जप्त करून टिप्पर चालक व मालक यांचेविरुद्ध कलम ३७९, १०९ भा. द. वयी. सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल सहिता १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग, ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, psi सदमेक, स.फौ, भगवान यादव पो.हवा, राकेश त्रिपाठी, पो.शी. रवी वानखडे, चा. पो. शी, सोरते यांनी केली.