नागपूर :- फिर्यादी नामे ओमेश शिवप्रताप शाहु, वय ४३ वर्षे, रा. चार खंबा चौक, प्लॉट नं. ४१/अ. आशी नगर, नागपूर यांचे पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत संघर्षनगर चौक, स्वामी नारायण मंदीर जवळ रॉयल क्लीप हटिल’ नावाचे हॉटेल असुन, तेथे आरोपी नामे अजीत सुरेश दुबे, वय २७ वर्षे, रा. काचीमेठ, प्लॉट नं. १५६, पॉपुलर सोसायटी, वाडी, नागपूर हा काम करतो. दिनांक १८.०९.२०२४ चे ०६.३६ वा. चे सुमारास, फिर्यादी है लॉकरची चाबी काऊंटरचे ड्राव्हर मध्ये विसरून तेथुन निघुन गेले असता, आरोपीने नमुद चाबीने लॉकर उघडुन लॉकर मध्ये ठेवलेले नगदी १,५०,०००/- रू. चोरी करून पळुन गेला. फिर्यादीने सि.सी.टी.व्ही. चेक करून पाहणी केली असता. आरोपीचे कृत्य दिसुन आले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि ठाकरे यांनी आरोपीविरूध्द कलम ३०६, भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.