अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

पोलीस स्टेशन रामटेकची कार्यवाही

नागपूर :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे रामटेक हद्दीतील ०६ किमी अंतरावर नवरगाव शिवार रामटेक येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ याने नमुद घटनास्थळी जावुन टिप्पर क्र. एम. एच. ४९ ए. डी. ०९९० च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात टिप्पर चालक व आरोपी नामे- निलेश पुरुषोत्तमभाई दुधांत, वय ३७ वर्ष, रा. भिमराव आगासे हाउस नं १४२ खरबी चौक, साईबाबा नगर, नागपुर हा टिप्परमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरी करतांना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून टिपर क्र. एम. एच. ४९ ए. टी. ०९९० किमी अंदाजे किंमती अंदाजे १०,००,०००/- रु. व ७ ब्रास रेती किंमती अंदाजे २१,०००/- रु. असा एकुण १०२१०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे- पोलीस शिपाई शरद गिते व नं. २३४३ पोस्टे रामटेक यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार हे करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन रामटेक येथील ठाणेदार यादव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोलीस नायक प्रफुल रंधई, मंगेश सोनटक्के, पोलीस शिपाई शरद गिते यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

किरणापुरचे शाहीर प्रदीप कडबे यांचा सत्कार

Tue Jul 4 , 2023
रामटेक :- सम्यक सांस्कृतिक लोककला निकेतन अंतर्गत राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान खडीगंमत कलापथक पळसाड तालुका कामठीच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह तथा गुरुवंदन सोहळा व शाहीरी मेळावा नुकताच १ जुलै ला कामठी तालुक्यातील पळसाड येथे मोठ्या थाटात पार पडला. यात रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांचा शाल श्रीफळ तथा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.    […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com