नागपूर :- फिर्यादी चंद्रशेखर ज्ञानेश्वर खडसे, वय ४७ वर्ष, रा. श्रीमहालक्ष्मी नगर, न्यू नरसडा, नागपुर यांचे पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत खुर्द, भुपेन्द्र हायस्कुल जवळ, विटाचा कारखाना असून कोनीतरी अज्ञात चोरट्याने विटाचे कारखान्यातील तिन लोखंडी साचे किमती अंदाजे ४५,०००/- रू चोरून नेले, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात हुडकेश्वर पोलीस ठाणेचे अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून सापडा रचून आरोपी क. १) शेख रहमान शेख इब्राहीम वय ३२ वर्ष, रा. आजाद कॉलोनी, छोटी मस्जिद ताजबाग, नागपूर २) सलीम रमजान शाह वय ३३ वर्ष, रा. आजाद कॉलोनी, निराला सोसायटी, ताजबाग, नागपूर ३) सुरज उर्फ भोसले हरीचंद जिवतोडे वय २६ वर्ष, रा. सावरगाव, ता. चिमुर जि चंद्रपूर, हम चंद्रशेखर खडसे यांचे विटा भट्टीवर हुडकेश्वर नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी कडुन गुन्हयात चोरी केलेले तिन लोखंडी साचा व गुन्हयात वापरलेली मालवाहु बजाज मॅक्सीमा अँटो असा एकूण ३,४५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी शिवाजीराव राठोड अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग, पोलीस उपआयुक्त, परि क. ४ विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिराजदार अजनी विभाग नागपुर यांचे मार्गदर्शना खाली वपोनि जागवेन्द्र राजपूत, पोनि (गुन्हे) विक्रांत सगने, पोउपनि प्रमोद खंडार, पोहवा शरद चव्हाण, मनोज नेवारे, संतोष सोनटक्के, नामोअ, प्रशांत कोडापे, दिनेश गाडेकर, संदिप पाटील, विजय सिन्हा, मंगेश मडावी, राहुल इंगोले यांनी केली.