अवैध रेती (गौणखनिज) ची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

खापा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पी.स्टे. खापा हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, एक इसम वाकोडी गावाच्या ग्रामपंचायत जवळ ट्रॅक्टर संलग्न टाली मध्ये अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमी वरून वाकोडी गावाच्या ग्रामपंचायत जवळ नाकाबंदी करीत असताना एक अवैध रेती वाहतुक संबंधाने जॉन डियर ५२०४ कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच-४०/एल- ४२३७ व ट्राली क्र. एम.एच-४०/एल- ५५८४ येतांना दिसले. सदर वाहनातील आरोपी नामे राजकुमार अन्नाजी चौधरी, वय ३६ वर्ष, रा. वार्ड क्र. २ वाकोडी सावनेर यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अंदाजे १२० स्के., फूट रेती (गौणखनिज) मिळून आल्याने सदर वाहन चालकास टिप्पर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर क्र. एम.एच-४०/एल- ४२३७ किंमती ५,००,०००/-रू. व ट्राली क्र. एम.एच-४०/एल- ५५८४ किमती ७०,०००/- रू. ये डाल्यात १२० स्केअर फुट रेती (गौणखनिज) किंमत १०००/-रू. असा एकुण ५,७१,०००/-रू, मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे राजकुमार अण्णाजी चौधरी वय ३६ वर्ष, रा. वाकोडी खापा व ट्रॅक्टरचे मालक त्याचे वडील अन्नाजी चौधरी यांचेविरुद्ध पोस्टे खापा येथे कलम ३७९ भादंवि, सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल सहिता अन्वये पो. स्टे. खापा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार राजू रेवतकर, किशोर वानखेडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

Sat Feb 24 , 2024
सावनेर :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. सावनेर येथे अप क्र. ८१४/१९ कलम ३७६, ३७६(३) भादवी सहकलम ४, ५ (जे) (२) ५ एल ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादीची अल्पवयीन पिडीत मुलीला आरोपी नामे बळीराम तुळशिराम इरपाची, वय ४५ वर्ष, रा. शेरहीता सावनेर जि. नागपुर याने पिडीतेच्या घरी कोणीही नसताना घरी येवुन वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com