– पोलीस स्टेशन मौदाची कारवाई
मौदा :-दिनांक ०८/१२/२०२३ रोजीचे ०९.२० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहिती वरून मौजा एन. एवं ५३ टोल नाका माधनी येथे ट्रकद्वारे अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. अशा माहिती वरून माधनी टोल नाका येथे नाकाबंदी केली असता भंडारा कडुन मौदाकडे एक महिंद्रा कंपनीचे आकाशी निळ्या रंगाचा काबीन व लाल रंगाचा डाला असलेला १४ चाकी ट्रक क. एम. एच २७/बी. एक्स. ३४६७ येतांना दिसल्याने त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला. सदर ट्रॅक चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव मोहम्मद जुनेद मोहम्मद जमिल रा. लालखड़ी अमरावती असे सांगितले. तेव्हा त्यास रेती वाहतुकीबाबत परवाना विचारले असता त्याने परवाना नाही असे सांगितल्याने सदर ट्रक चालकाचे ताब्यातून एक महिंद्रा कंपनीने आकाशी निळ्या रंगाचा कॅबीन व लाल रंगाचा डाला असलेला १४ चाकी ट्रक क्र. एम.एच २७/वी. एक्स. ३४६७ किंमती ४०,००,०००/- मध्ये १० ब्रास रेती किंमती ४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल एकुण किंमती ४०,४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल अवैध्यरीत्या विनापरवाना चोरून वाहतुक करतांनी मिळुन आल्याने मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणे मौदा येथे आरोपीविरूद्ध कलम ३७९ भांदवि, सहकलम ४८(८) महा, जमिन महसुल अधिनियम १९६६ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास पी. एस. आय मोहोड हे करीत आहे.