– पोलीस स्टेशन सावनेर ची कारवाई
सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पाटणसावंगी शिवार पाटणसावंगी टोल नाकावरून गिट्टीचुरीची चोरटी वाहतुक ट्रकने होत आहे, अशा माहितीवरून पाटणसावंगी शिवार पांटगसावंगी टोल नाकावर दहा चक्का पिवळया रंगाचा ट्रक क्र. एम.एच.-४० / बीजी- ७५७४ येताना दिसला. त्यांना थांबवुन विचारपुस केली असता मालक यांचा सांगण्यावरून बेकायदेशिररित्या बिनापरवाना शासनाचा कर चुकवून अवैधरित्या गौण खनीज, गीट्टी चुरीची कुठुन तरी चोरी करून वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपी ट्रक चालक नामे- दिनेश उर्फ उत्हास येसने व मालक नामे- राजेन्द्र पवनीकर रा. खापरखेडा यांच्या ताब्यातून ट्रक किंमती १००,००,००/- व तसेच ४ ब्रास गिट्टीचुरी किंमती ४०,८००/- रु. असा एकूण १०,४०,८००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
सदर प्रकरणी सरतर्फे फिर्यादी पोशि/ अंकुश मुळे व नं. ५४९ पोस्टे सावनेर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीतांविरुध्द कलम ३७९ १०९ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पो स्टे सावनेर हे करीत आहे.