जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

खापा :- अंतर्गत ०७ किमी अंतरावर मौजा पौनिकर यांचे शेतात रामडोंगरी सावनेर येथे दिनांक १७/१२/२०२३ ते दिनांक १८/१२/२०२३ चे २०.०० वा. ०६.०० वा. दरम्यान यातील मृतक नामे सूलका चाचेरे, वय ८० वर्ष, रा. चोपा, ता गोरेगाव जि. गोंदिया ह. मु. पौनिकर यांचे शेतात, रामडोंगरी ता. सावनेर हिचे महिला आरोपी (मृतकाची सुन) हिचे सोबत झालेल्या भांडणाचे कारणावरून मृतक हिचा नातू आरोपी क्र. १) मुन्नालाल किसन चाचेरे वय २३ वर्ष याने मृतक हिला दगडाने डोक्यावर मारून ठार मारले व महिला आरोपी सुनेने मृतकास लाकडी दांडयाने मारले व आरोपी क्र. ०१) व मृतक हिचा मुलगा आरोपी क्र. २) नामे किसन जोंधरू चाचेरे, वय ५० वर्ष तिन्ही रा थोपा, ता गोरेगाव जि गोंदिया है मु पौनिकर यांचे शेतात, रामडोंगरी ता सावनेर यांनी संगणमत करून मृतक हीची डेड बॉडी प्लॅस्टीकच्या थैलीमध्ये भरून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने जवळच असलेल्या रामडोंगरी परीसरातील पहाडी भागात फेकून दिले.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापा येथे आरोपीतांविरुध्द कलम ३०२, २०१, ३४ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी क्र. २) याला अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि मनोज खडसे, पो.स्टे. खापा हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एटीएमच्या मागे लिहला कोड, क्षणात रक्कम लंपास

Thu Dec 21 , 2023
– चोरीच्या पैशावर मौजमस्ती नागपूर :-रेल्वे गाडीत चढताना पर्ससह एटीएम चोरणार्‍या आरोपीने एटीएममधून सहज रक्कम काढली. कारण एटीएम नंबर लक्षात राहात नाही म्हणून एका व्यक्तीने एटीएम कव्हरवरच कोड नंबर लिहला. ही घटना लोहमार्ग पोलिस ठाण्याअंतर्गत घडली. लोहमार्ग पोलिसांनी सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या. अब्दुल वाहीद (35) रा. ताजबाग असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्रवाशांचे साहित्य आणि पर्स चोरण्यात तो पटाईत आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com