सावनेर :- दिनांक ०४/०३/२०२४ चे २०/०० वा. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बिहाडा फाटा चेक पोस्ट येथे जाऊन नाकाबंदी करत असता सदर आरोपी नामे- मोरेश्वर शेषराव गुरडकर, वय ३२ वर्ष, रा. जोगा ता. सावनेर, जि. नागपुर हा आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक मोटरसायकल क्र. MH-40 CL-8723 किंमती ५०,०००/- रू. येताना दिसल्याने त्याला थांबवुन दारूबाबत झडती घेतली असता गाडीवर २ प्लास्टिक कॅनमध्ये ३० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती १५००/- रु. चा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीकडुन १) मोहाफुल गावठी दारू १५ लिटर प्रत्येकी ५०/- रुपये लिटर प्रमाणे एकूण किंमती १५००/- रु २) इलेक्ट्रिक मोपेड गाडी क्र. MH -40 / CL-8723 किंमती ५०,०००/- रु एकुण किंमती ५१,५००/-रू. नवा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार संदिप नागरे हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे केळवद येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, सहायक फौजदार संदीप नागरे, पोलीस हवालदार मंगेश धारपुरे, पोलीस अंमलदार बोडुतात्या देवकते, महिला पोलीस हवालदार किरण भगत यांनी केली.