कामठी तालुक्यात गणरायाचे विसर्जन थाटात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाचे विसर्जन

कामठी :- दहा दिवसीय गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशी पर्वावर गणरायाचे कामठी तालुक्यात ठिकठिकानी गणपती बाप्पा मोरया ….पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात थाटात विसर्जन करण्यात आले.

मंगलमय वातारणात श्री गणेशाचे भक्ती भावाने भजन,पूजन, आराधना, व आदरातिथ्य केल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप देत महादेव घाट येथे विसर्जन करण्यात आले. विसर्जन दिवशी नदीत पाण्याचा जलस्तर वाढत प्रवाह वाढल्याने नदीला चांगलाच पूर आला होता यावेळी विसर्जन दरम्यान कुठलीही अनुचीत घटना न घडावी यासाठी प्रशासनाच्या पूर्वनियोजित नुसार ढिवर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विसर्जन सोय करण्यात आल्याने गणरायाचे सोयीस्कर विसर्जन करण्यात आले तसेच नदी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेत लायन्स क्लब कामठी च्या वतीने निर्माल्य व्यवस्थापन साठी महादेव घाटावर ठिकठिकानी निर्माल्य साधने व निर्माल्य संकलन कुंडी ठेवल्याने नागरिकांनी निर्माल्य तिथे संकलित करीत त्वरित स्वच्छता करण्यात आली. तसेच विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळाच्या स्वागतासाठी जुनी कामठी पोलीस स्टेशन समोर नेतेमंडळी नि मोठं मोठे स्वागत मंच तयार केले होते यानुसार भाजप,कांग्रेस,शिवसेना अशा विविध पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले गणेश विसर्जन तसेच मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी पोलीस निरीक्षक दीपक भिताडे , पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यानि ठिकठिकानी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवीत प्रत्येक हालचालीवर पोलिसांनी नोयंत्रण साधले होते.

कामठी चा राजाचे थाटात विसर्जन

श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात विराजमान कामठी चा राजा चे थाटात मिरवणूक काढून महादेव घाट कॅन्ट कामठी येथे विसर्जन करण्यात आले.

संस्थेचे सचिव सुरेश भोयर, उपाध्यक्षा अनुराधा भोयर, कार्यकारी संचालक अनुराग भोयर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर त्याचप्रमाणे संस्थेद्वारा संचालित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Thu Sep 28 , 2023
– शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत संशोधन पोहोचविणारा,भारताच्या हरितक्रांतीचा जनक हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- भारताला अन्न-धान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या कपाळावरचा अन्न-धान्य टंचाईचा कलंक पुसून देशातील गरीब शेतकऱ्यांना संकरित बियाण्यांच्या माध्यमातून अधिक उत्पादनाचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या निधनाने देशाच्या पहिल्या हरितक्रांतीचा जनक हरपला आहे, अशा शोकभावना व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com