नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिला फिर्यादी यांचा परिचित आरोपी नामे अभिषेक यशवंत सुर्यवंशी, वय ३१ वर्षे, रा. हिंगणा, नागपूर याने फिर्यादी महीलेचा वाढदिवस साजरा करण्याचे बहाण्याने फिर्यादी महीलेला त्याचे घरी घेवुन गेला व फिर्यादीस शरीरसुखाची मागणी करू लागल्याने फिर्यादीने नकार दिला असता, आरोपीने तिचे ईच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवुन फिर्यादीस वेगवेगळ्या ठिकाणी नेवुन शारीरीक संबंध प्रस्थापीत केले. तसेच, फिर्यादी महीलेचे फोटो व चित्रफित आरोपीने त्याचे मोबाईलमध्ये घेतले. फिर्यादी ही २०२१ मध्ये गर्भवती झाल्याने तिला गोळ्या देवून, तिचा गर्भपात घडवुन आणला. फिर्यादीने लग्नाकरीता म्हटले असता, लग्नास नकार दिला
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक २७.०२.२०२४ रोजी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे पोउपनि, नेमाडे यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३१२, ३७७, ३५४, ३५४(ड) भा. द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला. आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.