नागपूर :- गुन्हेशाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे पाचपावली हगीत अनिल नास्ता पॉईन्ट, पाचपावली येथे रेड कारवाई केली असता, त्या ठिकाणी कल्याण व प्रभात नावाने सट्टा-पट्टी द्वारे लगवाडी व खायवाडी करतांना ईसम नामे १) शिव चंद्रभान कांद्रीकर वय ३५ वर्ष रा. खडकारी मोहल्ला, गोळीबार चौक, पाचपावली, नागपूर २) रोहीत आनंद दाडेल वय २३ वर्ष रा. उक्करग्राम पाचपावली, नागपूर ३) महेन्द्र राजु विसोपे वय २६ वर्ष रा. पिली मारबत चौक, नागपूर हे समक्ष मिळुन आले. त्यांचे ताब्यातून आकडयांने नोंदी केलेल्या चिठ्ठया, रोख ५,४१०/- रू., चार मोबाईल फोन व अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ ए.एम ६७७४ तसेच मिबीझेड मोटरसायकल क. एम.एच ३१ डी.डब्ल्यू ७११ असा एकुण १,५२,४००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे पाचपावली येथे कलम १२ (अ) म.गु. का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना मुद्देमालासह पाचपावली पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्ल (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांने मार्गदर्शनाखाली, पोनि, मुंकूट ठाकरे व सहकार यांनी केली.