कळमेश्वर :- अंतर्गत निमजी खदान, ०८ किमी दक्षिण. दिनांक २४/०८/२३ चे अंदाजे ०७/३० ते ०८/०० दरम्यान, मृतक रामबदन उत्तरी पासवान, वय ४० वर्ष याचे प्रेत हे निमजी खदान येथील तलावाचे पाण्यात मिळून आल्याने सदरचे प्रेत हे बाहेर काढून पाहणी केली असता, सदर मृतकाचे डोक्याचे टाळूवर मोठी गंभीर जखम दिसून आल्याने त्यास अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी जाड व तिक्ष्ण हत्याराने डोक्यावर मारून जिवानिशी ठार मारले.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे- राजेश उत्तरी पासवान, वय ३७ वर्ष, रा. पिपरा मुरेरी, त. महाराजगंज, पोलीस थाना- घोगली, जि. गोरखपूर (यूपी), ह.मु पाटनसावंगी खदान, ता. सावनेर जि. नागपूर, यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ३०२ भादवि वा गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री यशवंत सोलसे पोस्टे कळमेश्वर हे करीत आहे