नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत जिंजर मॉल जवळ, जरीपटका नागपूर येथे फिर्यादी सौरभ मनोज दारोकर वय २८ वर्ष रा. प्लॉट न.. ८०. साई नगर, एम. आय. डी. सी. यांचे सिल्वर कॉल या नावाचे किरायाने कार देण्याचे कार्यालय आहे. आरोपी प्रखर शिशीर तिवारी वय २२ वर्ष रा मिलगाव याने फिर्यादी कडुन १) इनोव्हा गाडी क्र. एम. एच. २७. बी. ई. २९०० किमती १२,००,०००/- रु ची चालविण्या करीता किरायाने घेतली व काही दिवस पेमेंट दिले याप्रकारे आरोपीने फिर्यादी कडुन २) सेल्स गाडी क्र. एम.एच ३६ ए.जि १९९९ किमती १०,५०,०००/- रु. ३) होन्डा सिटी गाडी क्र. एम. एच. ४९ ए.ई ७८६५ किमती ७,००,०००/- रु ची ४) होन्डा सिटी एम.एच ४० ए.आर ६९६५ किमती ७,००,०००/- अशा एकूण पाच गाड्या किरायाने घेवुन गेला व गाड्यांचा एकुण किराया ३०,००,०००/- रू फिर्यादीस न देता टाळाटाळ केली व नमुद सर्व वाहने परस्पर गहान ठेवून, अपहार करून फिर्यादीची एकुण ६६,५०,०००/- रु ची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्जाचे चौकशीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे पोउपनि पुल्लेवाड यांनी आरोपविरुव कलम ४०६, ४२०, भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.
फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com