नागपूर :-फिर्यादी रविन्द्र दशरथ मोहाजे, वय ५९ वर्षे, रा. प्लॉट नं. २३, विश्वकर्मा नगर, रोड नं. ४, अजनी, नागपुर यांना त्यांचे मोबाईलवर मोबाईल क. ९११९३४५७२९ या धारक रोहन जोशी नावाचा ईसम तसेच मोवाईल क. ९१८९८२०५६०७९ ची धारक आयशा झा नावाची महिला यांनी संगणमत करून फिर्यादीस एसबीआय सर्विस ग्रुप व व्हीआयपी ग्रस्क फोर्स या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मॅसेज करून फिर्यादीस विश्वासात घेतले व फिर्यादीस स्टॉक/शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन, आमीष दाखवुन वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री करायला भाग पाडुन, त्यांचे खात्यामधुन आरोपी यांनी त्यांचे वेगवेगळ्या खात्यावर एकुण ६६,५०,२१८/-रू. घेवुन, नमुद रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे पोउपनि उपाध्ये यांनी आरोपों विरूध्द कलम ३१६(२), ३१८(४), १११(२) (ब) भा.न्या. सं. सहकलम ६६ (ड) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील सुरू आहे.