नागपूर :- पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत सुभाष रोड, कॉटन मार्केट, सैगेरीस इम्पैक्स कंपनी येथील आरोपी १) सुजाता मालेवार वय ३८ वर्ष २) साईकुमार जयकांत जयस्वाल दोन्ही रा. सुभाष रोड, कॉटन मार्केट यांनी संगणमत करून फिर्यादी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी वय ५३ वर्ष रा. २२, क्यून्स क्लोज, युनिट १२/१५७, सिंगापूर यांचे सोबत कार्यालयातून सोयाबीन व्यापाराबाबत २१० मॅट्रीक टन सोयाबीन भारतीय चलनात किमत १ करोड ५६ लाख ८२ हजार ८८५ रुपयाचे खरेदी बाबत करार केला. फिर्यादीने कार्गोने मुबई येथे माल पाठविला प्रकीया पूर्ण झाले नंतर आरोपींनी फेब्रुवरी २०२२ मध्ये संपूर्ण सोयाबीन आपले ताब्यात घेतले व ते कुपवाडा, सांगली एम. आय. डी. सी. येथील राधेकृष्ण एक्सट्रॅक्सन प्राय लिमी यांना विकले.
आरोपींनी कराराप्रमाणे माल विक्री केल्या नंतर फिर्यादीला मालाची रक्कम देणे अपेक्षीत होते परंतु आरोपींनी फिर्यादीस मालाचे रकमेचे एकुण १.५६,८२,८८५ /- रू न देता फिर्यादीची फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून व अर्जाचे चौकशीअंती पोलीस ठाणे गणेशपेठ येथे पोउपनि राउत यांनी आरोपीविरुद्ध कलम ४२० ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.