संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19:-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुने प्रभाग क्र 12 येथील नेहरू नगर, मोंढा परिसरात तरुण मराठा गणेश उत्सव मंडळ कामठीच्या तरुणांनी सन 1994मध्ये लोकवर्गणीतून सभा मंडप चे बांधकाम करण्यात आले होते .हे सभा मंडप नागरिकांच्या जनहितार्थ उपयोगी येत होते मात्र सद्यस्थितीत या सभा मंडपाची दयनिय अवस्था झाली आहे.तेव्हा लोकोपयोगी असलेले हे सभा मंडप पुन्हा नव्याने उभारून त्यात वाचनालय निर्मितो करण्याचे विचाराधीन आहे.तेव्हा आमदार टेकचंद सावरकर यांनी आपल्या स्थानिक निधीतून नविन सभामंडपाची निर्मिती करून देत निधी द्यावी या मागणीसाठी तरुण मराठा गणेश उत्सव मंडळ कामठी च्या वतीने रमेश बागडे यांच्या नेतृत्वात आमदार टेकचंद सावरकर यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी रोशन सपाटे, रोहन चौडे, प्रतीक पडोळे, निकेश टेकाडे, सागर राघोर्ते, कुणाल झोडापे, संजू कनोजिया,पंकज वर्मा, विजय कोंडुलवार, खांनवाणी आदी उपस्थित होते.