नागपूर :- पोलीस ठाणे मानकापूर हदीत राहाणाऱ्या २५ वर्षीय महीला फिर्यादीचे संमती शिवाय त्यांचे इंस्टाग्राम आयडीवर आरोपी नामे अक्षय दिगांवर बहादे, वय ३२ वर्षे, रा. पार्वती नगर, अजनी, नागपूर याने ईलेक्ट्रॉनीक माध्यमातुन बारकाईने लक्ष ठेवुन, पाठलाग केला, दिनांक ०८.०३.२०२४ से १८.०० वा. चे सुमारास, आरोपीने फिर्यादीस फोनवरून शिवीगाळ करून, मनास लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच, फिर्यादीचे फोटो तिच्या होणाच्या नवर्याला पाठवुन फिर्यादीची बदनामी केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक ०९.०३.२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापूर येथे पोउपनि, कांवळे यांनी आरोपीविरुध्द कलम ३५४(ड), ५००, ५०९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.