नागपूर :- फिर्यादीचा भाऊ नामे कबीर गणेश गवई, वय २२ वर्षे, रा. सिंगापूर सिटी अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०९, बेसा, नागपुर हा त्याचे बुलेट गाडी क. एम. एच. ४९, बी.जी ४५०८ ने पोलीस ठाणे हिंगणा हद्दीतुन मोहगाव ते झिल्पी कडे जाणाऱ्या रोडने जात असताना, कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे भावाचे बुलेट गाडीला धडक देवुन गंभीर जखमी करून पळुन गेला. जखमी यास उपचारकामी एम्स हॉस्पीटल येथे नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी शिलरत्न गणेश गवई, वय ३१ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे पोउपनि, राऊत यांनी आरोपीविरुध्द कलम २७९, ३०४(अ) भा.द.वि., सहकलम १३४, १७७, १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल करून, अज्ञात वाहनचालकाचा शोध करीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.