जलालखेडा :- दिनांक ०६/१०/२०२३ चे ११.०० वा. ते ११.३० वा. दरम्यान फिर्यादी ही ३ वर्षाआधी आरोपी क्र. १ राकेश पाथोडे वय २५ वर्ष, रा. तिनखेड़ा याला ओळखत होती फिर्यादीचे लग्न झाले तेव्हा पासुन आरोपी सोबत बोलणे बंद केले फिर्यादी व तिचा चुलत भाऊ घरात बसले होते व फिर्यादीचा पती संडासला गेला असता आरोपी नामे १) राकेश पाथोडे, वय २५ वर्ष २) पियुश ज्ञानेश्वर काहाते, वय २२ वर्ष दोन्ही रा. तिनखेडा हे दोन्ही आरोपी घरात आले व आरोपी क्र. १ नि म्हटले की, फिर्यादीच्या भावाला बाहेर जा असे म्हणुन आरोपीने फिर्यादीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य करून विनयभग केला. व फिर्यादीच्या भावाने फिर्यादीच्या पतीला आवाज दिल्याने पति संडासातुन बाहेर आले फिर्यादीच्या पतीला पोटाला लाथ मारून शिवीगाळी करून जिवाने मारण्याची धमकी दिली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. जलालखेडा येथे आरोपीताविरुध्द कलम ३५४, ४५२, ५०४, ५०६ भादंवी कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस नायक सुलोचना दुपारे व नं. ९३ या करीत आहे.