खापा :- दिनांक ०२/०३/२०२३ चे दुपारी ०२.३० वा. ते दिनांक २६/०९/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी व आरोपी नामे १) धीरन हिवरकर वय २१ वर्षे २) लकी धार्मीक वय २० वर्ष, ३) विकास हेडाउ, वय २३ वर्ष, ४) वेदु आवते, वय २३ वर्ष, ५) गोलु लिखार, वय २५ वर्ष, ६) लिलाधर चौरागडे, ७) सुशिल धार्मिक, ८) गौरव खुबाळकर, ९) प्रणय टेकाडे, १०) निखील वाद, ११) विक्की लिखार, १२) स्नेहल सुरकार वरील सर्व रा. खापा ता. सावनेर हे एकाच गावात राहत असून फिर्यादी हीचे पिडीत मुलगी वय १५ वर्ष हिचा यातील आरोपांनी वारंवार पाठलाग करून तिचे वडीलास मारण्याची धमकी देवून तिचे अश्लिल फोटो आरोपी क्र. ०१. ने मोबाईलवर मागवुन ते फोटो त्याचे मित्र इतर आरोपी त्याचे मोबाईलवर पाठवुन पिडीतेस ते फोटो दाखवून तिला भेटण्यास बोलावुन तिचे अश्लिल फोटो वायरल करून तिचे मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पिडीत मुलगी हिने पोलीस स्टेशनला येवुन पुरवणी बयाण दिले की धीरज हिवरकर याने त्याचे मोबाईलमध्ये तिचे अश्लील फोटो घेतले त्यानंतर गोलु लिखारा फिर्यादीजवळ आला आणि तिला पकडुन त्याचे घराचे आतील खोलीत घेवुन गेला. त्याचे सोबत धीरज हिवरकर, वेदु आवते, लिलाधर चौरागडे हे आले गोलु लिखार याने पिडीते सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तसेच गोल लिखार याने पिडीतेस फोटो वायरल करण्याची धमकी देवुन आपले घरी बोलावुन गोलु लिखारचे घरी दुसऱ्या खोलीत निखील वाद, गौरव खुबाळकर, सुशिल धार्मिक, गोलु लिखार याने एका पाठोपाठ पिडीते सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले, तसेच लकी धार्मिक, विकास हेडाउ, विक्की लिखार, स्नेहल सुरकार, प्रणय टेकाडे सर्व राहणार खापा यांनी पिडीतेस त्यांचे मोबाईलमध्ये पिडीतेचे फोटो आहे आणि ते फोटो वायरल करण्याची धमकी देवून वारंवार त्रास दिला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापा येथे आरोपीताविरुध्द कलम ३७६ (२) (एन), ३७६ (ड), (अ), ३५४(अ), ३५४ (ड), ५०६ भादंवी सहकलम ४, ६, ११, १२ बालकांचे लैंगिक अपराधपासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ६७, ६७(ञ) माहीती तंत्रज्ञान अधिनीयम २००० कलमवाद करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविन्द्र मानकर हे करीत आहे.