पो.स्टे. मौदा :- दिनांक १५/०९/२०२२ ते दिनांक २८/०२/२०२३ चे ००.०० वा. दरम्यान पिडीतेचे पती कैंसरने सन २१/०३/२०२१ ला मरण पावले व तिला २.५ वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे कामाचे शोधात जुलै २०२२ ला गुमथळा येथे राहायला आली. फिर्यादीचा मानलेला भासा नामे- सलमान कलौजे रा. तारसा हा येणे जाणे करीत होता तेव्हा त्याचे सोबत आरोपी नामे गोपीचंद साठवणे, रा. गारला हा सुद्धा येत होता. नेहमी येत असल्याने फिर्यादी व आरोपी यांचे फोनवर बोलणे करीत होता व मी तुझे मुलीला नाव देईन व तुझा सोबत लग्न करीन असे म्हणून फिर्यादी सोबत शारीरीक संबंध करत होता. काही दिवसांनी आरोपीने फिर्यादीला आपले घरी घेवुन गेला व लग्न करीन म्हणुन जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवत होता. नाही म्हटले तर शिवीगाळी करून मारहान करायचा जादुटोनाचे काम करायला चल असे म्हणायचा. दिनांक २८/०२/२०२३ ला शेवटचे शारीरीक संबंध केले ते सर्व फिर्यादीला सहन न झाल्याने मार्च महीन्यात फिर्यादी महीला मंडळ येथे गेली होती तेव्हा तो आरोपी तेथे खोट बोलून निघुन गेला नंतर आला नाही. दिनांक १५/०३/२०२३ ला फिर्यादी त्याचे घरून निघुन गेली व भगवान नाकाडे रा. मौदा यांचे कड़े किरायाने राहण्यास आली. मौदा येथे राहत असतांना डॉक्टर कडे चेक अप केले असता ५ महीन्याची गर्भवती असल्याचे सांगीतले. प्रायवेट दवाखान्यामध्ये गेली असता लग्नाने पुरावे मागीतल्याने सरकारी दवाखाना भंडारा येथे गेली असता ०५ महीन्याचे गर्भपात होत नाही असे सांगीतल्याने फिर्यादीने आरोपीला अबॉर्शन करून मागणे करीता खुप फोन केले परंतु फोन उचलले नाही व बोलावले असता अबॉर्शन करून देत नाही व फोनवर जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी याने फिर्यादीला लग्नाने आमिश दाखवून वारंवार शारीरीक संबंध केले व नकार दिल्यास मारहान केली व अबॉर्शन करण्यास टाळाटाळ केली.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक भुते पोस्टे मौदा या करीत आहे.