सावनेर :- सावनेर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पोस्टे सावनेर अंतर्गत हेटी (नंदाजी) येथे दि. २३/०९/२४ चे २१/४६ वा. २२/२५ वा. दरम्यान महेश भुरचंद्र राउत, वय ३६ वर्ष रा. हेटी (नंदाजी) ता. सावनेर ना.ग्रा हा तलवार घेवून फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोउपनि वी जी राठोर, सोबत पोलीस कर्मचारी सह गावात पोहचलो व आरोपी जवळीत तलवार जप्त केली नमुद आरोपी विरुध्द सरकारतर्फे पोउपनि बी जी राठोर यांचे रीपोर्ट वरून पोस्टे सावनेर येथे कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा, सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग तथा सहा. पोलीस अधीक्षक अनिल महस्के यांचे मार्गदर्शनात पोस्टे सावनेर येथील ठाणेदार पोनि उमेश पाटील यांचे नेतृत्वात त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली.