संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात स्थानिक पोलीस रात्रपाळीला गस्त घालीत असता रमानगर रेल्वे फाटक जवळ एक तरुण संशयीतरीत्या उभा दिसला त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून एक धारदार चाकू दिसल्याची घटना गतरात्री 8 दरम्यान घडली असून सदर आरोपी गुन्हेगारी वृत्तीचा असून कुठल्या तरी गंभीर गुन्हा करण्याच्या बेतात असल्याचे निष्पन्न झाले यासंदर्भात पोलिसांनी सदर तरुणाला धारदार चाकूसह ताब्यात घेत आरोपी मनोज उर्फ ददद्या वालदे वय 23 वर्षे रा रमानगर कामठी विरुद्ध भादवी कलम 4/25 आर्म एक्ट अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढोल तपास सुरू आहे.