पारशिवनी :- अंतर्गत ७ कि. मी. अंतरावरील मौजा खंडाळा मरीयंवी येथे दिनांक २८/०८/२०२३ चे १२.३० वा. दरम्यान यातील मृतक अर्चना हर्षवर्धन पाटील, २३ वर्ष, रा. खंडाळा मरीयंवी ता. पारशिवनी ही विवाहीत असून तिचे लग्नास एक वर्ष ०४ महिने झाले यातील आरोपी ०१) हर्षवर्धन कमलकिशोर पाटील, वय २४ वर्षे २) कमलकिशोर पाटील ३ ) ०२ महिला आरोपी सर्व रा. मौजा खंडाळा मरीयंबी ता. पारशिवनी यांनी संगणमत करून मृतक हिला तुझे आई वडीलांनी लग्नामध्ये सोन्याचे दागिने, फिज टिव्ही सोफा भेट वस्तु दिल्या नाही तु आपले माहेरून सोन्याचे दागिने व इतर भेट वस्तु घेवून ये नाहीतर माझे घरी राहायचे नाही. अशी हुंडयाची मागणी करून शारीरीक व मानसिक त्रास दिल्यामुळे मृतक हिने सासरचे त्रासाला कंटाळून स्वतः चे राहते घरी कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करून मरण पावली.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे- रामकिशोर चुनकावन कुरील, वय ५३ वर्षे, रा. सिल्लेवाड़ा खदान वार्ड क्र. ०२ दुर्गामाता मंदिर जवळ ता. सावनेर यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपीताविरुध्द कलम ४९८ (अ) ३०४ (ब) ३४ भादवि सहकलम ३४ हुंडा प्रतीबंध कायदा १९६१ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सोनवने पोलीस स्टेशन पारशिवनी हे करीत आहे.