भिवापूर :- पोस्टे भिवापूर येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, महेश मुत्तलवार नावाचा इसम मोसा क्र. एम. एच-४०/एन. एस-५७९९ ने देशी दारूची वाहतुक करतांना भिवापूर कडुन कारगावकडे जात आहे. अशा गोपनीय माहिती वरून पोस्टे टी पॉईंट परीसरात नाकाबंदी केली असता भिवापूरकडुन एक इसम मोसा एम. एच-४०/एन. एस-५७९९ ने जात असता सदर इसमास थांबवुन पाहणी केली असता मोसाचा चालक आरोपी नामे महेश नारायण मुत्तलवार वय ३५ वर्ष रा. शिवाजी ले आउट भिवापुर ता भिवापुर जि नागपुर याच्या ताब्यातून अवैधरीत्या विनापरवाना दोन लाकडी खरडया मध्ये ९६ निपा प्रती निप १८० एम एल एकुण १७,२८० एम एल, किंमती ६७२० रू तसेच मो सा क एम एच ४०/एन एच ५७९९ किंमती ३०,०००/- रू असा एकुण ३६७२०/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला. सदर मुद्देमालाबाबत परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सांगितले. पोस्टे भिवापूर येथे आरोपीविरूद्ध कलम ६५(अ), (ई) मदाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर आरोपीस सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल, परी, पोउपनि किरण महागावे व इतर स्टाफ यांनी पार पाडली.