कुही :- अंतर्गत २५ कि. मी. अंतरावरील मौजा चांपा येथे दिनांक १७/०८/२०२३ चे ०७.०० वा. ते ०७.३० वा. दरम्यान कुही पोलीस पथक पेट्रोलीग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोडुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून कुही पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन मुखबीरदारे मिळालेल्या खबरेवरून वाहन क्र. एम. एच. ४९ ए.टी -८७११ चे चालकाला वाहन थांबविण्याचा ईशारा केला चालकाने वाहन थांबविले असता सदर वाहनाची पाहणी केली. सदर वाहनात आरोपी नामे- १) किशोर पद्माकर छापेकर, वय ३० वर्ष, रा. वार्ड क्र. ३ चांपा २) नाजीर लुकमान कुरेशी, वय ४३ वर्ष, रा. ताजबाग झोपडपट्टी नागपूर याच्या ताब्यातून १) एक पांढन्या रंगाचा बैल किंमती १००००/- रु. २) ०३ लाल रंगाचे गोरे प्रत्येकी ५००० /- रु. प्रमाणे १५०००/- रु. ३) एक कोसा रंगाची लहान गोरी किंमती ५०००/- ४) वाहन क्र. एम. एच. ४९/ ए.टी -८७९१ किंमती ४००००० /- रू असा एकुण ४३००००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केले.
सदर प्रकरणी सरकार तर्फे पोलीस नायक ग्यानीवंत गुरपुडे व नं. ५४८ पो.स्टे. कुही यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कुही येथे वरील आरोपीविरुध्द कलम २१ (१) (व), ११(१) (ड), ११४) (सी) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा, सहकलम १८४, १३० १७७ मोवाका सहकलम १०९ भादवि कायान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार चांगदेव कुथे य. नं. ७२० पो.स्टे. कुही हे करीत आहे.