अवैधरीत्या विनापरवाना देशी विदेशी दारू बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

उमरेड  :- येथील स्टाफ उमरेड ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय सुत्राद्वारे माहिती मिळाली की, ओम साई प्लाझा कॉम्प्लेक्स अड्याळवाले ले आउट परसोडी उमरेडच्या बाजूला असलेल्या गल्लीत एका इसमाने दारूचा स्टॉक ड्राय डे च्या दिवशी विक्री करीता जमा करून ठेवला आहे. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह अड्याळवाले ले आउट परसोडी येथील ओम साई प्लाझा कॉम्प्लेक्स येथे रेड कारवाई करून आरोपी नामे दयानंद राजाराम येवले वय ५८ वर्ष रा. पडसोडी उमरेड याने एका पांढऱ्या चुंगडीमध्ये देशी विदेशी दारू विनापरवाना अवैधरीत्या बाळगल्याने आरोपीकडुन रॉयल स्टॅग कंपनीच्या प्रत्येकी १८० एम. एलच्या ५० काचेच्या सिलबंद निपा प्रत्येकी विक्री १८०/-रू प्रमाणे किंमती ९०००/- रू. २) ओल्ड मंक रम प्रत्येकी १८० एम एलच्या २० काचेच्या सिलबंद निपा प्रत्येकी विक्री १४५/- रू प्रमाणे २,९००/-रू. ३) ईम्पेरीअर ब्लू कंपनीच्या प्रत्येकी १८० एम एलच्या ४० काचेच्या सिलबंद निपा प्रत्येकी विक्री १६०/-रू. प्रमाणे ६,४००/-रू. ४) देशी दारू संत्रा ९९९ कंपनीच्या प्रत्येकी १८० एम एलच्या ४८ काचेच्या सिलबंद निपा प्रत्येकी विक्री ७०/-रू. प्रमाणे ३,३६०/-रू. असा एकुण २१,६६०/-रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीविरूद्ध कलम ६५(ई) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे उमरेड येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल राउत, पोउपनि खाटेले, पोहवा प्रदीप चवरे, राधेश्यात कांबळे, पोना पंकज ब‌ट्टे, पोअं. गोवर्धन शहरे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राधा कृष्ण मंदिर में श्री विग्रह ने किया नौका विहार

Sun Aug 18 , 2024
– शनिवार को झूलोत्सव में जादुई हांडी के होंगे दर्शन नागपुर :-श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में सावन झूलोत्सव जारी है। इसमें अनेक आकर्षक झांकियां दर्शन के लिए बनाई जा रही है। शुक्रवार को यमुनाजी में भगवान श्री राधाकृष्ण के श्रीविग्रह के भ्रमण की सुन्दर झांकी प्रस्तुत की गई | विशाल टैंक में यमुनाजी साकार लग रही थीं। इससे पूर्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com