नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हदीतील मोदी नं. ३, येथील काही दुकानदार हे अॅपल कंपनीचे आयफोन मोबाईलचे चार्जर, अॅडाप्टर, यू.एस.बी केवल, ईअर पॉड, आय पॅड केस कव्हर, मॅकबुक, व मोबाईल कव्हर इत्यादी साहित्याचे बनावटीकरण करून तयार केलेल्या मालाचा साठा करून विक्री करत असल्याचे प्राप्त तक्रार अर्जावरून सिताबर्डी पोलीसांनी दिनांक २९.०८.२०२३ च्या १६.५५ वा. चे सुमारास कंपनीचे फिर्यादीसह १) वाईट हाउस, सिताबर्डी २) श्री गणेश मोबाईल, ३) प्रथम मोबाईल, ४) लक्ष्मीनारायण मोबाईल शॉप या ठिकाणी धाड टाकली असता, आरोपी क्रमांक १) अजय शितलदास माखिजानी वय ४३ वर्ष रा. घर नं. ५ जरीपटका यांचे ताब्यातून ४३,४७,१००/- रू किंमती बनावट माल २) भूषन राधाकिशन गेहानी वय ५२ वर्ष रा. पर नं. १००३, सेतीया चौक, जरीपटका याचे ताब्यातून एकुण ५.९०,३००/- रु. किमतीचा बनावट माल ३) मनोज रमेशलाल धनराजानी वय ४५ वर्ष रा. कुंभ कॉलोनी, ब्लॉक नं. २५, जरीपटका याचे ताब्यातुन एकूण १४,७८,६००/- रू किमतीचा बनावट माल ४) साहिल विनोदकुमार बजाज वय २१ वर्ष रा. दयानंद पार्क जवळ, जरीपटका, यांचे ताब्यातुन एकुण २३,४३,०००/- रू किमतीचा बनावट माल असा एकुण ८७,५९,०००/- रू किमतीचा माल मिळुन आला. आरोपींनी उत्पादनाचे बनावटीकरण व साठेबाजी करून स्वतःचे आर्थिक फायदया करीता विक्री करीता जवळ बाळगुन अॅपल या कंपनीचे स्वामीत्व हक्काचे उलंघन केले. कंपनीचे अधिकारी यशवंत शिवाजी मोहिते वय ४२ वर्ष रा. सेक्टर २१, नेरूळ, नवी मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे आरोपीविरुद्ध कलम ५१ ६३ प्रतिलीपीक अधिकार अधिनीयम १९५७ सुधारीत अधिनीयम १९८४ व १९९४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त परि. के. ०२. नागपूर शहर, सपोआ, सिताबर्डी विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेन्द्र हिवरे, पोनि गुन्हे गेडाम, सपोनि संतोष कदम, पोउपनि विनोद तिवारी, पोहवा चंद्रशेखर, नापोअ आया मुंडे, प्रितम धिरज यांनी केली.