संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड येथील त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाने खोटे, व बनावटी बयाणपत्र,करारनामा ,पुस्तका छापून बोगस प्लॉट विक्री चा आर्थिक व्यवहार करून पीडित महिलेची 76 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पीडित फिर्यादी संगीता वांढरे वय 34 वर्षे रा हनुमान नगर,कन्हान ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजेंद्र यादव रा यादव नगर कामठी विरुद्ध भादवी कलम 420,468,471,406 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी महिलेला आरोपी राजेंद्र यादव ने सांगितले की घोरपड येथे त्रिमुर्ती बिल्डर्स अँड लॅण्ड डेव्हलपर्स नावाने ले आउट टाकले आहे.व मासिक किस्त मध्ये प्लॉट विक्री करतो असे प्रलोभन दिले.सदर प्रलोभणाला बळी पडून सदर महिला आरोपीच्या राहत्या घरी जाऊन आरोपीस प्लॉट नं 19 घेण्यासाठी 21 हजार रुपये बयांना दिले त्यावर आरोपीने 19 मार्च 2019 ला फिर्यादी महिलेला बोलवुन प्लॉट चा करारनामा करून दर महिन्याला 5 हजार रुपये भरण्यास सांगितले त्यानुसार पहिली किस्त 5 हजार रुपये सुदधा भरले वास्तविकता या आर्थिक व्यवहारात खोटे व बनावटी प्रकार होऊन 76 हजार रुपयाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच न्यायालयीन पायरी चढली सदर प्रकरणात न्यायालयाने कलम 156(3)सी आर पी सी अनव्ये आदेश पारित करून गुन्हा दाखल केला.