30 वर्षीय मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आठ आरोपीवर गुन्हा दाखल..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 13 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनी खलाशी लाईन, कादर झेंडा रहिवासी एका 30 वर्षीय मतिमंद तरुणीवर आरोपीने पीडित मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचा फायदा घेत घोरपड च्या झाडी झुडपात तसेच इतर ठिकाणी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 फेब्रुवारी 2023 ते 6 मे 2023 या कालावधीत घडली असून यासंदर्भात फिर्यादी पीडित मतिमंद तरुणीच्या आईने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 376,376(2)(1)एल 354 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासात आठ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्या या आठ आरोपीमध्ये चंदन नंदे,श्वरअरविंद रामटेके, मुकेश गजभिये, सुरेश निंदेकर, पुरुषोत्तम निंदेकर,धीरज नंदेश्वर, अशोक सिंगाडे,विनोद घोडेस्वार सर्व रा.जुनी खलाशी लाईन कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित तरुणी ही मतिमंद असल्याच्या फायदा घेत परिसरातील आरोपीनी तिच्या मानसिक दृष्टया कमजोरी चा फायदा घेत तिला घोरपड रोड च्या झाडी झुडपात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले दरम्यान या पीडित तरुणीच्या पोटाला कळा गेल्याने पोट खूप दुखत असल्याने पीडित तरुणीच्या आईने संशय बळकावला ज्यावर कदाचित तिला गर्भधारणा झाली असा आरोप करण्यात येत होता त्यानुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली होती त्यानुसार .फिर्यादी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून तपासांती आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed Jun 14 , 2023
मुख्य सचिवांना निर्देश, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक मुंबई :- बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com