संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25 :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 3 मध्ये झालेल्या सिमेंट रस्ता बांधकामाचा मिळकत असलेला कंत्राटी 50 टक्के प्रमाणात नफा न देता गुंतवणुकीत गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने सुदधा सोडवून न देता माजी नगरसेवकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी न्यायिक हक्कासाठी न्यायालयात केलेल्या अर्जावर न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम यांच्या तक्रारीवरून प्रभाग क्र 5 च्या नगरसेविका पुत्र आरोपी अजय वाधवाणी वय 33 वर्ष रा नेताजी चौक कामठी व माजी नगरसेविका बंधू सुरेश चावला वय 55 वर्षे रा सिंधी चॉल कामठी विरुद्ध भादवी कलम 406,418,420,424,427,477(क) अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2016 मध्ये प्रभाग क्र 3 चे सिमेंट रस्ता बांधकाम करण्यासाठी आरोपी सुरेश चावला ने माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम यांच्याशी संपर्क साधून सदर रस्ता बांधकाम दोघेही मिळून कंत्राटी पद्ध्तीने करू व कामाचा जो काही नफा येईल त्याचा 50 टक्के प्रमाणे वाटा करून घेऊ यानुसार सीट अँड सन्स या लायसन्स च्या नावावर कंत्राट मिळविले यासाठी फिर्यादी माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम ने 1 लक्ष 47 हजार रुपये मुख्याधिकारी नगर परिषद कामठी च्या नावाने भरून रस्ता बांधकामाला सुरुवात केली..दरम्यान बांधकामासाठी अजून पैश्याची टंचाई भासत असल्याचे आरोपी सुरेश चावला ने संगीतल्यावरून रघुवीर मेश्राम ने दागिने गहाण ठेवावे लागतील हे सांगितल्यावर दागिने सोडवून घेऊ असे आश्वासीत केल्यानुसार विश्वास ठेवत स्वतःचे सोन्याचे दागिने सोन्याचे ब्रेसलेट, चैन,चांदीचे ताट, ग्लास आदी गहाण ठेवून 3 लक्ष 53 हजार रुपये देऊन रस्ता बांधकाम पूर्ण केले या कामाचे बिल 23 लक्ष 20 हजार 669 रुपये चे बिल मुख्यधिकारी ने सीट अँड सन्स या नावाने अदा केले.आरोपी सुरेश चावला ने पैसे घेतल्यानंतर या कामाचा नफा घ्यायला रंघुविर मेश्राम गेले असता त्यांना काम अधिक झाल्याचा हिशोब दाखवून नफा 9 लक्ष 50 हजार रुपये तसेच गहाण ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने सोडविण्यस टाळाटाळ करीत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी यासंदर्भात नविन कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार केली असता पोलिसांकडून फिर्यादीचे समाधान न झाल्याने पीडित फिर्यादी माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम ने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कडे केलेल्या अर्जावरून न्यायालयाने जा फौ 156(3) प्रमाणे उपरोक्त आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .