नागपूर :- फिर्यादी विष्णु बुधराम निर्मलकर वय ३० वर्ष रा. लकडगंज राउत चौक, सुरण हॉटेल जवळ हा पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत किनखेडे ले आउट, राधे कोल्ड्रिंक पान पॅलेस, यशोधरानगर येथे पानठेल्या जवळ बसलेला असतांना तेथे आरोपी विनय उर्फ विक्की राजबहादुर शाहु वय २४ व रा. प्लॉट न. ११३, किनखेडे ले आउट यशोधरानगर हा व त्याचा मोठा भाऊ राकेश शाहु वय २६ वर्ष हे दोघे आले. फिर्यादीने राकेश शाहु यास उधार दिलेले २,०००/- कधी देणार असे म्हटले असता त्याने पैसे नहीं दूंगा और आज तुझे जान से मारूंगा” असे म्हणून लाकडी बलिने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देश्याने डोक्यावर मारून जखमी केले व त्याचे भावाने हातबुक्काने मारहाण केली. फिर्यादी याने त्याचे मोटरसायकलचे साईडचे बॅग मधुन चाकु काडुन आरोपी दोन्ही भावांना चाकुने मारून गंभीर जखमी केले. तिन्ही जखमींचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि सावतकर यांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३४ भादवि अन्वये तसेच फिर्यादी विनय उर्फ विक्की राजबहादुर शाहू वय २४ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विष्णू बुधराम निर्मलकर वय ३० वर्ष याचे विरुद्ध कलम ३०७ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून उपचारानंतर विष्णु यास पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे. पुढील तपास सपोनि मोटे हे करीत आहे
एकमेकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपीविरूध्द गुन्हे दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com