प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत नागपूर जबलपूर रोडवर, कमसरी बाजार बस स्टॉप कामठी येथे एक अनोळखी इसम वय ३५ ते ४० वर्ष हे जात असतांना एका अज्ञात वाहन चलकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्या इसमास धडक देवून पळून गेला. अपघातामध्ये त्या अनोळखी इसमाचे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारकामी उप जिला रूग्णालय कामठी येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी पोलीस ठाणे नविन कामठी येथील पोउपनि संजय आठवले ९९२३६१८००५ यांनी अज्ञात वाहन चालकाविरूध्द कलम ३०४(अ) २७९, भा.दं. सहकलम १३४, १७७, मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी ताब्यात

Fri Jul 21 , 2023
नागपूर :- दिनांक २०,०७,२०२३ च्या १५.३० वा. चे सुमारास फिर्यादी खुशी सरोजकुमार मेश्राम वय १९ वर्ष रा. नं. २५७ सुगतनगर पोलीस चौकी मागे नागपुर या त्यांचे मित्रासह त्यांच्या दुचाकी गाडीने नारा गावाकडे गाडी देण्यासाठी जात असतांना नाराघाटचे रोडवर फिर्यादीची मैत्रीण शिल्पा २० वर्ष रा. गट्टीखदान नागपूर व तिचे सोबत तिचा मित्र सुयोग परसराम उके वय २३ वर्ष रा. इंदोरा, जेतवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com