नागपूर :- दिनांक १४.०६.२०२३ मे १९.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत खोब्रागडे चौक, जरीपटका, नागपुर येथून फिर्यादी मुकेश लखनलाल पटले, वय १९ वर्षे रा. रेणुका अपार्टमेंट बँक ऑफ बडोदा जवळ, जरीपटका हा त्याचे एव्हेंजर मोटार सायकल क्र. एम. एच. ३१ डी. एक्स ९५७५ ने मागे त्याचे आई व मामी इमलाबाई रूपेश्वर टेंभरे, वय ४५ वर्षे, रा. वार्ड नं. ०४ पांडवपारा, जेवणारा, ता. केवलारी, शिवणी (म.प्र.) असे ट्रिपल सिट जात असतांना एका टाटा पिकअप क्र. एम. एच. ४० बि.जी. ८३०२ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे मोटार सायकलला मागून धडक मारल्याने फिर्यादीची मामी खाली पडुन गंभीर जखमी झाल्या फिर्यादीने त्यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. आरोपी हा मृतक हयांचे मृत्युस कारणीभूत झाला व वाहनासह पळून गेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे मपोउपनि काळे यांनी आरोपी पिकअप वाहन चालका विरुद्ध कलम ३०४(अ) २७९ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.
प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com