प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- फिर्यादी नामे ईनायद शहादत पठान, वय १८ वर्षे, रा. आदर्श नगर, नंदनवन, नागपूर हे त्यांचे ज्युपीटर गाडी क. एम. एच ४९ वि.जी ७९०४ ने फिर्यादीचा भाऊ आसिफ रहीम पठान वय १८ वर्ष व अरमान जावेद कुरेशी वय १७ वर्ष व फिर्यादीचे आत्याचा मुलगा नामे अमन नियाजुद्दीन शेख वय २३ वर्ष असे मामाचे घरून वाढदिवसाचा कार्यक्रम करून चौघेही वर नमुद ज्युपीटर गाडीवर बसुन पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतुन खोब्रागडे चौक येथुन जात असतांना, स्कार्पीयो गाडी क. एम.एन ४० सि.क्यू ०००२ ने चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे गाडीला धडक देवुन पळुन गेला. अपघातामध्ये चौघेही वाहनासह खाली पडुन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी अमन नियाजुद्यीन शेख वय २३ वर्ष रा. आदर्श नगर, नागपूर यास तापासुन मृत घोषीत केले. जखमींचा उपचार सुरू आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे पोउपनि, वाकडे यांनी स्कार्पीयो वाहन चालक आरोपीविरूध्द कलम १०६, २८१, १२५(अ), १२५(व), भा.न्या.सं. सहकलम १३४, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक ०२ गुन्हे उघडकीस

Wed Oct 23 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहणारे फिर्यादी नामे मनोज भानुदास गजभिये, वय ४६ वर्षे, रा. लॉट नं. २२०, बाळाभाऊपेठ, पाचपावली, नागपुर यांनी त्यांची तिन चाकी ई-रिक्षा क्र. एम.एच. ४९ वि.एम ५६१७ किंमती ९०,०००/- रू. ची आपले घरा समोर हँडल लॉक करून व पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची ई-रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com