नागपूर :-दिनांक २६.०९.२०२४ चे २१.०० वा. चे पुर्वी, फिर्यादीचा भाऊ मुस्ताक खान वल्द मुक्तार खान वय ३८ वर्ष रा. गल्ली नं. ८, हसनबाग, हरीभाऊ कोल्ते अपार्टमेंट, नंदनवन, नागपूर हा त्याचे मोटरसायकलने पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतुन प्रजापती रेल्वे कॉसिंग जवळुन जात असतांना त्यास एका अज्ञात एक बालकाने मागुन धडक देवुन गंभीर जखमी करून पळून गेला. गंभीर जखमी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, त्यांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी ईम्तीयाज खान वल्द मुक्तार खान वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं ४३, हसनबाग, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि, वदि यांनी अज्ञात ट्रक चालकाविरुध्द कलम १०६(१), २८१ भा.न्या.सं. सहकलम १३४, १७७ मो.वा. का अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.