नागपूर :- फिर्यादीचे वडील नामे वसंत श्रावण गेडामकर, वय ७८ वर्षे, रा. वर नं. २३५, कुणबी मोहल्ला, जरीपटका, नागपूर हे त्यांचे अॅक्टीवा दुचाकी ने त्यांचे घरून सेमीनरी हिल्स येथे औषध घेण्यासाठी जात असता, पोलीस ठाणे सदर हद्दीत मेश्राम पुतळा चौक येथे एका अज्ञात दुचाकी वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे वडीलांचे गाडीला धडक दिल्याने ते खाली पडले. तसेच त्यादरम्यान पाठीमागुन येणाऱ्या काळ्या रंगाची टाटा हॅरीयर कार क. एम.एच. ३१ एफ.यु. ८९५४ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे वडीलांचे अंगावरून नेल्याने ते गंभीर जखमी झाले, गंभीर जखमी यांना उपचाराकरीता शांतीमोहन हॉस्पीटल, सदर येथे नेले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी अक्षया शैलेष वाशिमकर, वय ४६ वर्षे, रा. त्रिशरण नगर, खामला, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे सदर येथे पोउपनि, वाकडे यांनी दोन्हीही वाहन चालकाविरुध्द कलम २८१, १०६(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.