अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यु

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र  :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावाजवळ गादा मार्गे सावनेर ला दुचाकी ने जात असलेल्या कंत्राटी शिक्षकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मि होऊन उपचारादरम्यान आज दुपारी दीड दरम्यान मृत्यु पावल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृतक शिक्षकाचे नाव राजू देशपांडे वय 50 वर्षे रा तीर्री पोस्ट मिलसी ता पवनी जिल्हा भंडारा असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक शिक्षक हे मागील काही वर्षांपासून सावनेर पंचायत समिती च्या गटसाधन केंद्रात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून सावनेर ला भाड्याची खोलीत वास्तव्यास होते तर आठवड्यातून एक दिवस मूळ गावी दुचाकीने यायचे यानुसार 22 जुलै ला दुचाकीने आपल्या मूळ गावी येऊन काल 25 जुलै ला सकाळी आठ वाजता घरून दुचाकीने स्वार करीत गादा मार्गे सावनेर ला नोकरीवर रुजू होण्यासाठी जात असता दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकी क्र एम एच 36 ए डी 1601 च्या चालकाला दिलेल्या जोरदार धडकेतुन घडलेल्या गंभीर अपघातात सदर शिक्षक जख्मि अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले असता मदतीला धावून आलेले चेतन खडसे यांनी उपचारार्थ कामठी च्या आशा हॉस्पिटल ला हलविण्यात आले मात्र परिस्थिती नाजूक असल्याने उपचारा दरम्यान आज दुपारी दीड दरम्यान जख्मि शिक्षकाचा मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपी अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा नोंदविला असुन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले असून पुढील तपास पोलीस संजय पिल्ले करीत आहेत.मृतकाच्या पाठीमागे।पत्नी व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ओव्हरहेड वायर तुटल्याने रामानगर रेल्वे फाटक वरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Wed Jul 27 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र  :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मुंबई-हावडा रेल्वे मार्गाच्या कामठी रेल्वे मार्गावरील 1115/30रेल्वे की मी अंतरावरील कामठी रेल्वे स्टेशन ते रमानगर रेल्वे फाटक मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याचा प्रकार आज सायंकाळी सहा दरम्यान घडली.ज्यामुळे कामठी हुन कळमना कडे जाणारी रेल्वेमाल गाडी तूर्तास बंद पडली असून बराच वेळ होईपर्यंत एका रेल्वेरूळावरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com