– अध्यक्ष- अजय पाटील; प्रमुख कार्यवाह- नरेश गडेकर
नागपूर :- अ. भा. मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी अजय पाटील यांची तर नरेश गडेकर यांची प्रमुख कार्यवाहपदी व संपूर्ण कार्यकारिणीची अविरोध निवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेला अ. भा. मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीतर्फे नियामक मंडळ सदस्य, वाशीमचे उज्वल देशमुख निरिक्षक म्हणून उपस्थित होते. या सभेत पंचवार्षिक निवडणूक या विषया अंतर्गत कार्यकारिणी करीता १९ सदस्यांची एकमताने निवड करण्यात आली. विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत ८ पदाधिकारी आणि ११ कार्यकारिणी सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. प्रमुख कार्यवाह पदावर नरेश गडेकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणी अशी: अध्यक्ष- अजय पाटील, उपाध्यक्ष- (प्रशासन) विष्णू मनोहर, उपाध्यक्ष- (उपक्रम) दिपक मते, प्रमुख कार्यवाह – नरेश गडेकर, कोषाध्यक्ष -अविनाश सोनुले, सहकार्यवाह- राकेश खाडे, वैदेही चवरे – सोईतकर, नितीन (लक्ष्मीकांत) पात्रीकर;
कार्यकारीणी सदस्य – प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकसे, संजय रहाटे, किशोर डाऊ, कविता भुरे, प्रशांत मंगदे, अभय अंजीकर, सलीम शेख, डॉ. रवींद्र भुसारी, डॉ. राजेश नाईक आणि निलेश खांडेकर.