संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4:-आई वडीलासह बुद्धदर्शनासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलाचा कंठमांडू येथे अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला तर मृतक मुलाचा आईचा गंभीर अपघात झाल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी दहा दरम्यान घडली असून मृतक मुलाचे नाव आयुष अश्विन बन्सोड रा.आनंद नगर कामठी तर जख्मि आई चे नाव योगिता अश्विन बन्सोड वय 35 वर्षे रा आनंद नगर कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार कामठी येथील आनंद नगर रहिवासी अश्विन देवनाथ बन्सोड वय 35 वर्षे हे व्यवसायाने ऑटोचालक असून बुद्धदर्शनासाठी पत्नी योगिता,मुलगा आयुष व कुटुंबातील नातेवाईक असे एकुण 7 कुटुंबीय सदस्य 29 जून 2022 ला नेपाळला गेले होते तर 5 जुलै ला परत येण्याचे नियोजित होते.दरम्यान काल कुटुंबासह बुद्धदर्शन करीत असता काठमांडूला मृतक आयुष चे वडील अश्विन बन्सोड हे रस्त्याच्या पुढे जात असताना मृतक आयुष व त्याची आई योगिता ह्या रस्त्याच्या कडेला उभे होते दरम्यान एका बोलेरो कार ने रिव्हर्स घेत असता कार चा ब्रेक न लागल्याने कारची धडक ही उभे असलेल्या मायलेकाला लागल्याने घडलेल्या गंभीर अपघातात 5 वर्षीय चिमुकला मुलगा आयुष हा जागीच मरण पावला तर मृतक आयुष ची आई योगिता चे दोन्ही पायावर गंभीर जख्म झाली असून उपचारार्थ काठमांडू च्या शासकीय इस्पितळात दाखल आहे.या घटनेची माहिती बन्सोड कुटुंबियासह शहरात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून आनंद नगर परिसरात शोकमय वातावरण पसरले आहे.