चंद्रशेखर वराडपांडे हे आध्यात्मिक उपासक , नितीनजी गडकरीचे गौरवोदगार...
नागपुर – विदर्भातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, गीतकार, काव्यलेखक, शेगावचे संतश्रेष्ठ गजानन महाराज व महाशक्ती अनसूयामातेचे निस्सीम भक्त व प्रचारक, रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संस्थापक वै. वंदनीय संतकवी कमलासुत (बाबा) श्री चंद्रशेखर वराडपांडे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढी सुसंस्कृत व्हावी या वै. वंदनीय संतकवी कमलासुत श्री चंद्रशेखर वराडपांडे यांच्या जीवनी फलकाचे उदघाटन भारत सरकार चे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते भाविकवृंदांच्या उपस्थितीत
करण्यात आले, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार नागो गाणार सर,दक्षिण नागपूरचे भाजपा मंडळ अध्यक्ष देवेनजी दस्तुरे, गजानन महाराज श्रद्धास्थानाचे संयोजक श्री गिरीशजी वराडपांडे, ऍड रमण सेनाड, डॉ श्रीरंग वराडपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रशेखर वराडपांडे संतकवी कमलासुत हे अध्यात्मिक उपासक असून हजारो भक्तपरिवाराला त्यांनी भक्तिमार्गाद्वारे धर्म जागरण व जीवन जगण्याचा संदेश दिला, उत्कृष्ट नाट्यलेखक, गीतकार असून त्यांच्या लेखन व काव्याचा तसेच त्यांनी केलेल्या ईश्वरीय सेवाकार्याचा प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी लोकजागृती मोर्चा नागपूर चे संयोजक ऍड रमणजी सेनाड यांनी पुढाकार घेऊन गजानन चौक रेशीमबाग येथील संतकवी कमलासुत नामकरण मार्गांवर त्यांच्या साहित्याची माहिती देण्यात आली.या जीवनीचे वाचन ऍड रमण सेनाड यांनी केले.याप्रसंगी रेशीमबाग येथील नागरिक व गजानन महाराज श्रद्धास्थानातील भक्त परिवार मोठया संख्येत उपस्थित होता.